मुरूम मोडवर प्रहारचे चक्का जाम आंदोलन ;
शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांकरिता आंदोलन
मुरूम,दि.२४:
शेतकरी कर्ज माफी व इतर मागण्याकरीता येणेगूर मुरूम मोड येथे गुरुवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ठीक ठिकाणी आज शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजे व शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
महामार्गावरील येणेगूर मुरूम मोड येथे ही चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी उपस्थित राहून चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिला व शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे व शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीन पिकाला 6 हजार रुपये क्विंटल हमी भाव मिळाला पाहिजे असे ते म्हणाले.
तसेच उबाठा गटाचे शेतकरी तालुकाध्यक्ष विजय तळभोगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुका अध्यक्ष अजीम खजुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे, शेतकरी तालुकाध्यक्ष विजय तळभोगे, येणेगुर ग्रामपंचायत सदस्य संतोष कलशेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे लोहारा तालुका अध्यक्ष वामन ढोणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुका उपाध्यक्ष आनंद माने,प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे तालुकाध्यक्ष अभय साळुंखे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष पंडित जळकोटे, व सचिन खांडेकर,हुसेन मुल्ला, अक्रम माळवाले, मोहम्मद शेख, मोहम्मद आतार, जाफर मुल्ला, आसिफ शेख,आसिफ मुल्ला,तसेच येणेगूर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.