तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी संदीप उद्धव सुरवसे यांची नियुक्ती
नळदुर्ग,दि.२४ :
काँग्रेस कमिटीच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी संदीप उद्धव सुरवसे यांची नियुक्ती धाराशिव जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष अँड धीरज कदम पाटील यांनी केली आहे.
आपल्या भागातील काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी आपण जोमाने कार्य करावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, दिलीप भोकरे, अँड अरविंद बेडगे, इमाम शेख, अजय बागडे, कलीम शेख, शौकत कुरेशी, मुजमिल कुरेशी, अजीम कुरेशी, हुसेन कुरेशी, जैल कुरेशी, आबेदिन कुरेशी, वजादत काझी, राजाभाऊ जाधव, नाना शितोळे , संजय कदम आदींनी सुर्वे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.