भोईराज गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी अमर डुकरे, उपाध्यक्षपदी मंदार पुदाले यांची निवड 

नळदुर्ग,दि.२४ : 

 शहरातील भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे यांच्या अध्यक्षतेखाली भोईराज गणेश मंडळाची  बैठक होवुन नुतन कार्यकरणीची निवड  सर्वानुमते  करण्यात आली. अमर भारत डुकरे यांची अध्यक्षपदी तर मंदार पुदाले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नळदुर्ग येथिल क्रांती चौकातील मरिआई सभागृहात गुरुवार दि.२४ जैलै  रोजी सायंकाळी भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होवुन नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली . यावेळी भोई समाजाचे उपाध्यक्ष दिपक (महेश) डुकरे,  सतीश पुदाले, सागर कौरव, रवी सुरवसे, प्रशांत पुदाले, गणेश पुदाले, विजय  दास्कर, नितीन पुदाले, यांच्यासह मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.

नुतन गणेश मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष अमर डुकरे, उपाध्यक्ष मंदार पुदाले, सह उपाध्यक्ष प्रविण दासकर, कोषाध्यक्ष शुभंम डुकरे, सहकोषाध्यक्ष राहुल दासकर, सचिव सचिन भोई, सह सचिव चंदन पुदाले, आदींची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या नुतन कार्यकारणीचे अभिनंदन केले जात आहे.


 
Top