शिवछञपती तरुण मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरज जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश पवार, प्रशांत लबडे यांची निवड

तुळजापूर दि.२५:

तुळजापूर शहरातील शिव छञपती तरुण मंडळ  गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरज जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश पवार व प्रशांत लबडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून शिव छञपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यादरम्यान अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतले जातात.

माजी नगराध्यक्ष  नेते देवानंद रोचकरी यांच्या मार्गदनाखाली तथा मंडळाचे आधारस्तंभ  कृष्णा  रोचकरी व गणेश  रोचकरी, रोहित पवार, नितीन  घोलकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या नुतन अध्यक्षपदी सुरज जाधव व उपाध्यक्षपदी प्रकाश पवार व प्रशांत लबडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 तसेच कोषाध्यक्षपदी रोहन पुजारी, सचिवपदी अनिरुध्द जाधव व श्रवण  पुजारी तर मिरवणूक प्रमुखपदी संदीप  चौगुले , पवन सोनवणे यांची देखील यावेळी निवड करण्यात आली.

यावेळी गणेशोत्सव दरम्यान घेतले जाणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी मंडळाचे मार्गदर्शक कृष्णा  रोचकरी,गणेश  रोचकरी, रोहित पवार, नितीन घोलकर,राहुल जाधव  यांच्यासह मंडळातील सर्व सहकारी सदस्य  उपस्थित होते.
 
Top