नळदुर्ग : वसंतनगर येथे  बस थांबा परिसरात विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांसठी स्वच्छतागृह नगरपालिका प्रशासनाने बांधावे, अन्यथा नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

नळदुर्ग,दि.२५ :

नळदुर्ग येथील वसंतनगर या ठिकाणी बस थांबा परिसरात महिला व पुरुषाकरिता स्वच्छतागृह बांधून देण्याची मागणी न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे दि. 25 जुलै रोजी लेखी निवेदनाद्वारे नागरिकांनी केली आहे.

 निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, वसंतनगर येथील बस स्टॉप येथे दोन्ही बाजूने मंदिर व व्यावसायिक आहेत. महिला व पुरुषांना लघुशंका करण्याकरीता सोय नाही.

 येत्या पंधरा दिवसात स्वच्छतागृह बांधण्याबाबत उपाय योजना करावे अन्यथा नगरपालेकेवर  मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
निवेदनावर दिलीप राठोड, रवी महाराज राठोड, राहुल जाधव, युवराज जाधव ,बबन राठोड, शांताबाई जाधव, हूनकाबाई राठोड, सुशीला जाधव , कमळाबाई राठोड, विमलाबाई जाधव, छायाबाई चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

रवी महाराज राठोड, वसंतनगर (नळदुर्ग)

वसंतनगर व दुर्गानगर येथिल लोकसंख्येच्या तुलनेत  सार्वजनिक ठिकाणी (बस थांबा ) येथे शौचालया अभावी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनीसह महिला व पुरुष यांची कुचंबणा होत आहे. याठिकाणी लघुशंका करण्यासाठी व स्वच्छतागृह बांधण्याबाबत न.प. प्रशासनास पाच महिन्यांपूर्वी नागरिकांच्या वतीने लेखी अर्ज करुन विनंती केली.मात्र पालिकेने मुलभुत सुविधा पुरविण्याच्या प्रश्न गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केले आहे.नुकतेच गेल्या महिन्यात प्रभाग एकमध्ये भारतीय जनता पक्षाचे जनता दरबारात हा प्रश्न नागरिकांनी अग्रक्रमाने मांडले. मात्र हा प्रश्न अजुनही तसाच भिजत घोंगडे पडल्यासारखे आहे. तरी न.प. प्रशासनाने त्वरित स्वच्छतागृह बांधण्याबाबतचा विषय मार्गी लावावे असे रवी महाराज राठोड यांनी सांगितले.
 
Top