न.प.चे कार्यालयीन अधिक्षक खलील शेख यांनानिवेदन देताना भाजयुमोचे शहराध्यक्ष गणेश मोरडे, विजय ठाकूर, पत्रकार सुहास येडगे आदी.
नळदुर्ग : घाणीच्या साम्राज्यात भरणारा शहरातील आठवडी बाजार इतरत्र भरविण्याची भाजयुमोची मुख्याधिकारीकडे मागणी
नळदुर्ग,दि.०७ :
नळदुर्ग शहरांमध्ये सध्या रविवार रोजी भरणारा आठवडी बाजार घाणीच्या साम्राज्यात भरत असल्याने भाजी विक्रेते व शेतक-यासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याकरिता जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भरणारा आठवडी बाजार कायम स्वरुपी पोलीस स्टेशन ते चावडी चौकापर्यंत भरविण्याची मागणी होत आहे.
नळदुर्ग शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरत असुन तो बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रापासून कुरेशी गल्ली पर्यंत भरत आहे. याठिकाणी अत्यंत घाणीचे साम्राज्य असून कायम सर्वत्र दुर्गंधी असल्याचे सर्वश्रुत आहे.
अरोग्य केंद्र येथील गटारी पावसामुळे तुडूंब भरलेल्या आहेत. त्या गटारी मधील घाण पाणी भाजीपाला, फळे, इत्यादींवर जात आहे. भाजी विक्रेत्यास बसायला जागा नाही. भाज्यांवर माश्या व विविध कीटक बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, विक्रेते व नळदुर्गकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कांहीं दिवसावर पवित्र असा श्रावण महिना आला असून लोकांचे कल भाजी व फळे घेण्यावर अधिक असणार आहे. यामुळे भाजी तसेच फळे यावर बसणारे कीटक माश्या व गटारीचे घाण पाणी यामुळे आरोग्यास कधोका पोहचू शकते. त्याकरिता कायमस्वरूपी आठवडी बाजार हा. पोलिस स्टेशन ते चावडी चौक इथपर्यंत भरविण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सोमवार दि.०७ जुलै रोजी करण्यात आली आहे.निवेदनावर भाजयुमो चे नळदूर्ग शहराध्यक्ष गणेश मोरडे, सुनिल गव्हाणे, विजय ठाकूर यांच्या स्वाक्षरी आहेत.