शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी;
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन
नळदुर्ग,दि.०८ :
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी महाराष्ट्र शासनाने तातडीने करावे या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दि.०८ जुलै रोजी सकाळी आकरा वाजता नळदुर्ग येथिल महामार्गावरील संविधान चौकामध्ये रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
यात प्रामुख्याने पिकविमा, ऊसाचे थकीत बिल, दुष्काळी आनुदान, अतिवृष्टी आनुदान, कृषी विभागाचे विविध योजनेचे थकीत आनुदान यासह शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी, धाराशिव जिल्हयात शेतकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर, गैरप्रकार करणा-या अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करावी तसेच जिल्हा भुमिअभिलेख धाराशिव व उपअधिक्षक भुमी अभिलेख तुळजापूर येथील प्रभारी राज संपवून कायमस्वरूपी अधिकारी नेमणूक करावी, उपाधिक्षक भुमिअभिलेख तुळजापूर येथील कर्मचा-यांची भोंगळ कारभाराची विभागीय आयुक्त यांच्या मार्फत खातेनिहाय चौकशी करावी इत्यादीसह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 व 652 प्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे. याप्रसंगी दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकुर , श्रीमंत फडतरे, महादेव बिराजदार आदीनी मनोगत व्यक्त केले.
या रास्ता रोको आंदोलनात मानसिंग ठाकुर, गुलाब शिंदे, श्रीमंत फडतरे, संतोष फडतरे, तोलू शेख, महादेव बिराजदार, बंडू मोरे, काशिनाथ काळे, पंडित पाटील, गणपत सुरवसे, माशाळकर वीरपक्ष, अशोक जमादार, हरिदास भोसले, आकाश देशमुख, राघू देशमुख, संतोष पाटील, राजेंद्र सुरवसे, प्रदीप सुरवसे, श्रीकांत पोतदार, शांतेश्वर पाटील, धनाप्पा पाटील, विजयकुमार पाटील, दिलीप पाटील, प्रतापसिंग ठाकूर, सुधाकर बिराजदार, अजमोद्दीन शेख आदीसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी शेतकऱ्यांचा विविध मागण्यांचे निवेदन ग्राम महसुली अधिकारी संध्या कुलकर्णी यांना देण्यात आले.
पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.