नळदुर्ग शहर व्यापारी गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सुभाष कोरे, उपाध्यक्षपदी संदीप  सुरवसे , कल्लप्पा  कलशेट्टी यांची निवड 

नळदुर्ग,दि.२९ :

शहरातील  व्यापारी गणेश मंडळाची सोमवार दि.२८ जुलै रोजी मल्लिकार्जून मंदिर सभागृहात बैठक होऊन व्यापारी गणेश मंडळाची नुतन  कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही बैठक व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले यांच्या अध्यक्षतेखाली होवुन सर्वानुमते अध्यक्षपदी सुभाष कोरे, तर उपाध्यक्षपदी संदीप सुरवसे ,कल्लाप्पा कलशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.

यावर्षीची निवड करण्यात आलेली नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष  सुभाष सिद्दाप्पा कोरे, उपाध्यक्ष  संदीप उद्धव सुरवसे , कल्लप्पा चंद्रकांत कलशेट्टी, कोषाध्यक्ष  मल्लीनाथ महादेवप्पा शिरगुरे, सचीव शंतनु अंबादास डुकरे आदी.यावेळी नुतन अध्यक्ष सुभाष कोरे यांचे  व्यापारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले.

या बैठकीस गतवर्षीचे अध्यक्ष सुजित बिराजदार, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश अशोकराव पुदाले , कार्याध्यक्ष मुकुंद नाईक , सचिव संतोष राम मुळे , उपाध्यक्ष उमेश नाईक ,  अतुल हजारे , सल्लागार  दयानंद स्वामी, सुधीर पाटील, वैजीनाथ कोरे, राजेंद्र महाबोले व इतर व्यापारी उपस्थित होते.


 
Top