धन्यकुमार बिराजदार कृषी अधिकाऱ्याचा जिल्हाधिकारी यांच्या हास्ते उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरव
नळदुर्ग,दि.०६ :
शेतकरी व शेतीनिष्ठ असलेले , मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नळदूर्ग येथे उपकृषी अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या धन्यकुमार बिराजदार यांचा नुकतेच धाराशिव जिल्हा परिषद सभागृहात कृषी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार , मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या हस्ते उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बिराजदार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जळकोट ता.तुळजापूर येथिल श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळ, प्रभात मंडळ अणदुर, योगेश क्षिरसागर,व्यंकटेश नाईक आदीसह परिसरातील शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त १ जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श मैनाक घोष यांचे हस्ते करण्यात आला.तसेच शेतकरी यांच्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषि विभागातील अधिकारी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव , सचिन सूर्यवंशी कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर, महादेव आसलकर उपविभागीय कृषि अधिकारी धाराशिव,कृषि विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.