भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित जनता दरबारात ३५ तक्रारी नोंदवल्या; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नळदुर्ग,दि.०५ जुलै
भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार दि.०५ जुलै रोजी नळदुर्ग शहरातील प्रभाग क्रमांक ३ इंदिरानगर येथिल सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी १० ते १ वाजण्याच्या कालावधीत आयोजित जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संकल्प ते सिद्धी अभियान नरेंद्र मोदी सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आले होते . यावेळी नागरिकांनी ३५ तक्रारी नोंदविल्या .त्यामध्ये प्रामुख्याने इंदिरानगर येथे राहणाऱ्या बहुतांश कुटुंबाच्या घर जागेची नोंद न.प. दप्तरी घेवुन सर्व लाभार्थ्यांना भोगवटदार नोंदणीची नक्कल प्रशासनाने दिली असुन प्रधानमंत्री आवास योजन/ रमाई आवास योजनेचे त्वरित लाभ देण्याची मागणी , बंद असलेले पथदिवे चालु करणे, पिण्याचे पाणी आदी तक्रारीचा समावेश आहे.
याप्रसंगी भाजपचे नेते सुशांत भूमकर यांनी उपस्थिताना सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास भाजपचे नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे,पद्माकर घोडके, माजी नगरसेवक निरंजन राठोड, जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, दत्तात्रय कोरे, संजय जाधव, पांडुरंग पुदाले, सुनील बनसोडे, रियाज शेख, कल्पना गायकवाड, आनंद पवार, संदीप गायकवाड,, मुद्दसर शेख, अक्षय भोई, मयूर महाबोले, नाना काझी, शशिकांत घोडके सुदर्शन पुराणिक, बबन चौधरी, मुस्ताक शेख, सैपन शेख, आफताब शेख आदीसह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक कल्पना गायकवाड यांनी केले तर आभार धिमाजी घुगे यांनी मानले.