ज्ञाना भेटी निघाले शाळकरी; जिल्हा परिषद  शाळेच्या विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडी

मुरुम,दि.०६ :

मुरूम येथील जि प स्पेशल प्रा शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडी काढली. आषाढी एकादशीला वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात. जगाच्या कल्याणासाठी साकडे घालतात. अगदी तसेच जगाच्या कल्याणासाठी जि प स्पेशल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानाशिवाय प्रगती नाही. झाडाशिवाय जीवन नाही असा संदेश देत गाव प्रदिक्षणा केला. हातात पुस्तक घेऊन वाचाल तर वाचाल,  डोईवर इवलेसे रोपटे ठेवून एक पेड माॅ के  नाम घोषणा दिल्या.
 हनुमान चौक, विठ्ठल मंदिर, साठे नगर, नगरपरिषद, आंबेडकर शहर वाचनालय समोर रिंगण करून फुगडी खेळले. गौतमी लिमये, विश्ववेध मुरूमकर, गुंजन लिमये, कनिष्का किरात हे विठ्ठल रखुमाई वेशभूषा केले होते. दिक्षांत कांबळे व प्रशांत देडे यांनी ग्रंथ दिंडी वाहिली. अध्यक्ष व शिक्षकांनी फुगडी खेळून विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये, शिवराज कांबळे, माजी अध्यक्ष आनंदकुमार कांबळे, सदस्य, माता पालक यांची साथ लाभली.

    
 टाळ, चिपळी व मृदंगाच्या गजरात दिंडी घेऊन शहर प्रदिक्षणा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे, सुनिता मिरगाळे, शिवाजी गायकवाड, मंगल कचले व रुपचंद ख्याडे यांनी अथक परिश्रम घेतले.
 
Top