भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात सर्वाधिक १८३  दात्यांनी केले रक्तदान 

नळदुर्ग ,दि.२२ : नवल नाईक 

 राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य  साधुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नळदुर्ग मंडल व ग्रामीण मंडल यांच्या वतीने नळदूर्ग शहरात आयोजित  रक्तदान शिबिरात  सर्वाधिक म्हणजे १८३ दात्यांनी रक्तदान केल्याची नोंद झाली. 

मंगळवार दि.२२ जुलै रोजी नळदुर्ग शहरातील लोकमान्य वाचनालय येथे  भाजपच्या वतीने  रक्तदान शिबीर संपन्न झाले. शहर व परिसरातील  युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबीराने यापुर्वीचे रक्तदानाचे आकडे मोडित काढले आहे.
रक्तदात्यामुळे अनेकांना जिवनदान मिळणार आहे.हे दान अमुल्य असुन आतपर्यंत नळदुर्गमध्ये झालेल्या शिबिराच्या तुलनेत सर्वाधिक रक्तदान झाले असल्याचे सांगून सर्व रक्तदात्याचे , हेडगेवार रक्तपेढीच्या सर्व टिम, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार भाजपचे नेते सुशांत भुमकर यांनी मानले.

भारतीय जनता पक्षाचे  जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन तथा युवक नेते  सुनीलराव चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अँड दीपक आलुरे , तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड आदीनी रक्तदान शिबीरास भेट दिली.

नळदुर्ग तालुका मंडल अध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण महिला मंडल अध्यक्षा सौ  रंजनाताई  राठोड
, भाजपचे नेते सुशांत भूमकर, नय्यर जागीरदार, संजय बताले, पद्माकर जेवळे, साहेबराव घुगे, किशोर धुमाळ, सचिन घोडके, दयानंद मुडके, प्रवीण घोडके, देवसिंगा (नळ)चे सरपंच युवराज पाटील, केशेगावचे मल्लिनाथ गावडे, शहापूरचे उमेश गोरे ,लोहगावचे प्रवीण पाटील, खुदावाडीचे शरणाप्पा कबाडे, अमर नरवडे , निलेश  आलुरे, इमाम फरिद शेख, दिलीप सोमवंशी, पांडू पुदाले, भिवाजी इंगोले, श्रमिक पोतदार, धिमाजी घुगे, गणेश मोरडे,उमेश नाईक ,उदय जगदाळे ,निरंजन राठोड, छमाबाई राठोड, कल्पनाबाई गायकवाड, सुदर्शन पुराणिक, संदीप गायकवाड, विनायक अहंकारी, अक्षय भोई ,मुजीब शेख, नाना काझी, रियाज शेख, अभिजीत लाटे, सागर हजारे, संजय जाधव, आवेज इनामदार, पप्पू पाटील, वैभव पाटील, मारुती घोडके, किशोर सुरवसे, अतुल भोसले, बबन चौधरी, सलीम बागवान, मुकुंद नाईक, जमन ठाकूर, मुद्दसर शेख, प्रवीण चौगुले, संजय मोरे, विक्रांत दूरुगकर, स्वीय साहाय्यक अबुल हसन रजवी आदी उपस्थित होते.

सोलापूर येथील हेडगेवार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सुशांत कुलकर्णी, सौ नभा घाटे, सौ दिवा कुलकर्णी, सौ माधुरी शिंदे, सौ मंगल कुंभार, डॉ अक्षय पाटील, सतीश पुजारी, राजू गुजर, अरविंद कुलकर्णी, प्रतीक मडिवाळ इत्यादीनी रक्त संकलन करण्यास मदत केली.

 
Top