तहसिलदार पी.एस.गायकवाड नळदुर्ग येथे अपर तहसिलदार म्हणुन घेतले पदभार 

नळदुर्ग,दि.०९ :

तहसिलदार पी.एस.गायकवाड यांनी नळदुर्ग अपर तहसिल कार्यालयात अपर तहसिलदार म्हणुन रुजू झाले.  त्याबद्दल  नळदुर्ग शहर भाजप कार्यकर्त्यांनी बुधवार दि. ९ जुलै रोजी नुतन तहसिलदार गायकवाड यांचा सत्कार करून स्वागत केले. तहसिलदार गायकवाड हे यापुर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे कार्यरत होते.

याप्रसंगी नळदुर्ग शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, जिल्हा सरचिटणीस श्रमिक  पोतदार, पत्रकार शिवाजी नाईक, माजी नगरसेवक निरंजन राठोड, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष अक्षय भोई,  नायब तहसीलदार भोकरे पि.एस.,महसुली अधिकारी विश्वास वायचाळ , कोतवाल दत्ता सर्जे आदि उपस्थित होते.

नळदुर्ग येथे सहा महिन्यांपूर्वी अपर तहसिल कार्यालय कार्यान्वित झाले. सुरवातीस धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार  अभिजीत जगताप यांच्याकडे प्रभारी पदभार होता. त्यानंतर किशोर यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. 
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top