माधवराव पाटील महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत ; नविन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यान संपन्न
मुरूम,दि.७:
श्री . माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम येथे बी ए, बी कॉम व बीएससी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ व नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. उद्धव भाले, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नळदुर्ग यांनी अतिशय सविस्तर अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आयक्यूएसी समन्वयक प्रा डॉ राम बजगिरे होते त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा डॉ सतीश शेळके संचालक, नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम तसेच नॅक समन्वयक, मुकुंद धुळेकर त्याचबरोबर प्रा डॉ सुजित मटकरी व प्रा डॉ सुशील मठपती एनईपी 2020 समन्वयक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले .
या कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा डॉ सुजित मटकरी यांनी केली तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ सुशील मठपती यांनी करून दिला .याप्रसंगी बोलताना नवीन शैक्षणिक धोरण ही बदलत्या शैक्षणिक काळाची गरज आहे असे मत प्रा डॉ भाले यांनी मांडले . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे अतिशय महत्त्वाचे आहे असे मत अध्यक्षीय समारोप करताना डॉ राम बजगिरे यांनी मांडले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा डॉ मुकुंद धुळेकर यांनी मानले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .