वसंतनगर (नळदुर्ग) श्री सेवा सार्वजनिक तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी कैलास चव्हाण, खजिनदारपदी राहुल जाधव, आनंद राठोड यांची निवड 

नळदुर्ग,दि.०९ : 

नळदुर्ग शहरातील वसंतनगर येथे श्री सेवालाल मंदिर सभामंडपात शनिवार दि.०८ : ऑगस्ट रोजी 
श्री सेवा सार्वजनिक तरुण गणेश मंडळांची बैठक होवुन  नुतन कार्यकरणीची निवड करण्यात आली. सर्वानुमते 
अध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची  तर खजिनदार म्हणुन 
राहुल जाधव, आनंद राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष आकाश जाधव

नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्षपदी कैलास सुभाष चव्हाण , उपाध्यक्ष आकाश गणपत जाधव, सचिव अभिजित वालचंद राठोड , खजिनदार राहुल जाधव , आनंद राठोड , कोषाध्यक्ष आकाश संजय राठोड , मिरवणूक प्रमुख विनायक जाधव, मोतीराम राठोड,  सुरेश राठोड ,दत्ता राठोड, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सदस्य  म्हणुन  मानसिंग राठोड , सचिन माणिक राठोड ,युवराज फुलचंद जाधव,श्रीराम गुलचद राठोड आदींची निवड करण्यात आली. सर्व नुतन  पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. 

या बैठकीस शेखर राठोड, किरण राठोड ,रवी चव्हाण, मुकेश चव्हाण, गणेश राठोड, सुनील चव्हाण , रवी राठोड, खंडू राठोड, गोविंद राठोड, निलेश राठोड , राहुल राठोड, करण चव्हाण, आकाश चव्हाण, स्वप्निल राठोड,
सुनील राठोड,आदीसह मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक, कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदाच्या गणेशोत्सवात लेझीम पथक करणार असून, टिपरी, संगीत खुर्ची, खो खो, महिलाकरिता  रांगोळी स्पर्धा, लहान बालकांसाठी नृत्य स्पर्धा यासह विविध सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे नुतन अध्यक्ष कैलास चव्हाण यांनी दिली. यावेळी प्रास्ताविक राहुल जाधव तर  आभार दत्ता  राठोड यांनी मानले.

 
Top