विकृतीने पछाडलेल्या त्या आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
नळदुर्ग,दि.०८
महामार्गावरील नळदुर्ग एस.टी.बसस्थानकात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह प्रवाशांनी गजबजलेल्या ठिकाणी, सार्वजनिक प्रवासी आसनावर बसुन विकृतीने पछाडलेल्या एका मौलवीने मोबाईलवर मोठ्या आवाजात अश्लील चित्रफित पाहात अश्लील हावभाव केल्याची घटना सर्वत्र व्हायरल झाली.याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुळजापूर (मनविसे) तालुका विभाग अध्यक्ष गणेश बिराजदार यांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे नळदुर्ग पोलिस निरीक्षक यांच्याकडे दि.७ ऑगस्ट रोजी केली आहे.