जवाहर महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती साजरी
अणदुर दि.30 चंद्रकांत हागलगुंडे
अणदुर ता.तुळजापूर येथिल जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व जवाहर मंडप कॉन्ट्रॅक्टरचे प्रमुख भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. उमाकांत सलगर ,क्रीडा समितीचे सदस्य, डॉ.मल्लिनाथ बिराजदार, डॉ. सूर्यकांत आगलावे, डॉ. माधुरी गडसिंग, प्रा. शैलेश शाहिवाले, डॉ. प्रसन्न कंदले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.चनशेट्टी म्हणाली की, मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या माध्यमातून भारताला वैभवाच्या शिखरावर नेऊन पोहोवचण्याचे कार्य केलेले आहे. त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये एक प्रकारची जादू होती म्हणून त्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. त्यांचे खेळ पाहून जर्मनीचे प्रमुख हिटलर यांनी आमच्या देशाच्या बाजूने खेळण्यासाठी आमंत्रण दिले. पण त्यांनी आपल्या देशाभिमानामुळे ते न स्वीकारता भारतासाठी खेळत राहिले . जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्राभिमान त्यांच्यात दिसून येते.त्यांचे कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करून क्रीडा विभागाच्या माध्यमातून आपले जीवन घडवावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.