नळदुर्ग शहरातील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात  विघ्नहर्त्या   गणरायाची प्रतिष्ठापना

नळदुर्ग, दि.२७:

नळदुर्ग शहरातील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवारी विघ्नहर्ता श्री  गणरायाची प्रतिष्ठापना भक्तीमय व उत्साही वातावरणात करण्यात आली.
प्रारंभी भाजपचे नळदुर्ग शहर  मंडल अध्यक्ष बसवराज धरणे व उपस्थित मान्यवरांच्या हास्ते "श्री" चे पुजा करुन श्रीफळ वाढवून, आरती करण्यात आली.
यावेळी भाजपचे नेते सुशांत भुमकर, . शहर उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पद्माकर घोडके, माजी नगरसेवक सुधीर हजारे, निरंजन राठोड, उमेश नाईक, पत्रकार विलास येडगे, उत्तम बणजगोळे,तानाजी जाधव, शिवाजी नाईक, अमर भाळे , बंडू कसबेकर, संजय दशरथ जाधव, सुभाष समन, अक्षय भोई, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
 
Top