श्री तुळजाभवानी मंदिरातील गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा

तुळजापूर,दि.२७:

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील गणेश विहारामध्ये आज (२७ ऑगस्ट) गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

वाजत-गाजत श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात झालेल्या या मिरवणुकीनंतर गणेशमूर्तीची विधिपूर्वक स्थापना गणेश विहारामध्ये करण्यात आली. मंत्रोच्चार, पूजा-अर्चा यामध्ये सहभागी होत भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले.

या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, नागेश शितोळे, ओंकार काटकर, सुधीर कदम, ऋषभ रेहपांडे, उमेश गुंजाळ, दयानंद जोगदंड यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे गणेश विहारामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी गणपती बाप्पाच्या जयघोषात मंदिर परिसर दणाणून सोडला.
 
Top