स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बचत गटाच्या महिलांना न.प. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते प्रमाणपत्र 
वाटप

नळदुर्ग,दि.१५: 

शुक्रवार दि.15 ऑगस्ट  रोजी नगरपालिकेत  79 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात आला. यावेळी हरित धाराशिव अभियानांतर्गत  नळदुर्ग शहरात 30 हजार वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी बचत गटाच्या महिलांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, माजी नगराध्यक्ष नय्यरपाशा जहागीरदार यांच्या हास्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमात रेखा अवचार, जिजाबाई जाधव, सुनीता जाधव, सबेरा सय्यद, सुरेखा शिरूरे, निर्मला काळे, बायडाबाई कांबळे, कल्पना गायकवाड, मयुरी जाधव, लैला सय्यद,बेबाबाई जाधव,निर्मला काळे, सीमा येडगे, सुरेखा शिरूरे, रेखा अवचार,अयोध्या दोपारे,ज्योति बागल, कोंडाबाई गायकवाड, शारदा घोडक, सुकमार काळे, कमल काळे, सुरेखा भिसे, प्रमिला गायकवाड, कमल घोडके ,निशा मुळे, परविन शेख, सुनिता बिराजदार, उषा लांडगे ,भाग्यश्री आरळे, हिराबाई आरळे, रुपाली पोतदार, संगिता पोतदार, अंजली पोतदार, संजीवनी फुलारी, सुजाता वाघमारे,चतुराबाई कांबळे, मिना जगताप, सुनंदा लकडे, जयश्री येडगे, प्रभावती पवार, शशिकला पवार आदींना प्रमाणपत्र देण्यात आले.

  याप्रसंगी माजी नगरसेविका न. प .चे नगर अभियंता रत्नकांत पिचे, कार्यालयीन अधिक्षक खलील  शेख, अभियंता समीर मोकाशी, स्वप्निल काळे, राजेंद्र रोमन, खंडू शिंदे, बाबा डुकरे, सुशांत भालेराव, ज्योतिर्लिंग बाचाटे, अमित गायकवाड, आनंद खरवे, वाल्मिक खारवे, बाबा पारधे, नवनाथ होनराव, प्रेम राठोड, तानाजी गायकवाड, दस्तगीर जहागीरदार, मुंतजीब शेख, उमर बागवान, फुलचंद सुरवसे, किशोर बनसोडे, भिमसेन भोसले, जनार्धन कांबळे, विकास कांबळे, मुकुंद भूमकर, शहाजी येडगे, खंडू नागणे,  मयुरी जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड यांनी  तर आभार रानुबाई सपकाळ यांनी मानले.
 
Top