हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत रांगोळी स्पर्धा
नळदुर्ग ,दि.१३:
येथिल नगरपरिषदेच्या बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून "हर घर तिरंगा " उपक्रमांतर्गत बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धा नळदुर्ग न.प. चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला बचतगटाच्या २५ ते ३० महिला सहभागी झाल्या होत्या.स्पर्धकांनी सर घर तिरंगा यावर आधारित आकर्षक अशी तिरंगा कलरची रांगोळी काढली आहे.
या स्पर्धेसाठी न प कार्यालयातील सूरज गायकवाड सहाय्यक प्रकल्प अधिकारी, दीक्षा सिरसाट पाणी पुरवठा अभियंता, रानुबाई सपकाळ समुदाय संघटिका, सुशांत भालेराव, खंडू नागणे, शाहजी येडगे यांनी परिश्रम घेतले.तसेच भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्ष जिजाबाई जाधव, कुलस्वामिनी गटाच्या मयुरी जाधव, संकल्प गटाच्या कोंडाबाई गायकवाड, मारंगी गटाच्या रेणुकामाता गटाच्या कल्पना गायकवाड, आशा गायकवाड व इतर बचत गट सहभागी होते.