नळदुर्ग,दि.२३ :
शहरातील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६९ वा वर्धापन दिन" उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी एन सी सी चे प्रमुख लेफ्टनंट डॉ अतिष तिडके, , राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा .सावते, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे व एनसीसी विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.