नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवून विकासाला चालना देण्याची घौडदौड सुरु - भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश देशमुख यांचे मत
नळदुर्ग,दि.२३ :
विरोधाकांनी भाजपबद्दल अपप्रचार करुन समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांनी सर्वधर्म समभाव जोपासले, त्यांचा वारसा भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील पुढे चालवत आहेत. नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवून विकासाला चालना देण्याची घौडदौड सुरु असल्याचे मत प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश देशमुख यांनी नळदुर्ग येथे बोलताना व्यक्त केले.
नळदुर्ग शहरातील (रहीमनगर, ठाकरेंवर, व्यंकटेश नगर, रामलीलानगर, प्राध्यापक कालनी , भवानीनगर) प्रभाग क्रमांक ९ मधील बाळकृष्ण मंदिर याठिकाणी शनिवार दि.२३ऑगस्ट रोजी भाजपच्या प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत आयोजित जनता दरबारात सुरेश देशमुख हे बोलत होते.
संकल्प ते सिद्धी अभियान नरेंद्र मोदी सरकारचे आकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शनिवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळकृष्ण मंदिर ,डीएड कॉलेज रोड, येथे जनता दरबार पार पडले. यावेळी रस्ता, नाली पाणी, बगीचा करणे, पथदिवे,
२५ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
याप्रसंगी नळदुर्ग मंडल अध्यक्ष बसवराज धरणे,
माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार ,शहर उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पद्माकर घोडके, माजी नगरसेवक विनायक अहंकारी,निवृत्त परिवहन अधिकारी नंदकुमार डुकरे, राजा ठाकूर, विशाल डुकरे, अक्षय भोई, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ पांडूरंग पुदाले, बंडोपंत पुदाले ,मुद्दसर शेख, नाना काझी, सुनिल उकंडे, संजय विठ्ठल जाधव, किरण डुकरे, निवृत्त मुख्याध्यापक बलभिम मुळे, प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार खद्दे, एजाज उस्ताद, समीर शेख, मोहम्मद गाताडे,आवेज इनामदार,शफी शेख, दनियाल शेख, आरिफ पठाण, संतोष कलशेट्टी, डि.एस.वाघमारे, आदीसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी नंदकुमार डुकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनायक अहंकारी यांनी केले