तुळजाई नगरीत संत सेना महाराज सभागृहाचे भूमिपूजन ; नाभिक समाजास निधी कमी पडू देणार नाही - आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर,दि.२४ : अनिल आगलावे
नाभिक समाजाचे आराध्य संत शिरोमणी श्री संत सेना महाराज नाभिक समाज सभागृहाचे भूमिपूजन तुळजापूर शहरातील कुंभार गल्ली कारपार्किंग शेजारील नियोजित जागेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. नाभिक समाजाच्या या सेवाकार्यास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे मत आमदार पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सकल नाभिक समाजाचा तुळजापूर येथील मागील 40 वर्षापासुन प्रलंबित जागेचा प्रश्न आमदार
राणाजगजितसिंह पाटील तसेच युवा नेते विनोद गंगणे यांच्या माध्यमातून यंदा मार्गी लागला असून या जागेवर संत सेना महाराज सभागृह निर्माण कार्यास शुभारंभ नाभिक बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भूमिपूजन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,पंडित जगदाळे,अनिल काळे,विजय कंदले नारायण नन्नवरे,शिवाजी बोधले,आनंद कंदले, रामचंद्र रोचकरी,निलेश रोचकरी,औदुंबर कदम, अविनाश गंगणे,किशोर साठे,ऋतुराज भोसले, शांताराम पेंदे,निलेश अमृतराव, प्रसाद पानपुडे, प्रकाश मगर,संदीप गंगणे,लखन पेंदे,धैर्यशील दरेकर,विशाल छत्रे, सचिन रसाळ,सागर कदम आदींसह नाभिक बांधव उपस्थिती होते.