धाराशिव जिल्हा अतिवृष्टी नुकसानपोटी हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट शेतकऱ्यांना देण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी
नळदुर्ग,दि.१८:
धाराशिव जिल्ह्यात आचानकपणे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन सोयाबीन, ऊस, उडीद, भाजीपाला, फळबाग ईत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक आडचणीत सापडलेला आहे .पेरणी, खुरपणी, बि बियाणे, महागडी खते शेतात घालुन पिके जोपासले. परंतु अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवरती संकट आल्याने आवस्था अतिशय बिकट झाली आहे . शासनाने पिक नुकसानपोटी प्रती हेक्टरी ५० हजार रुपयाची सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अप्पर तहसीलदार मार्फत कृषीमंत्री याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
निवेदनावर २५ ते ३० शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.यावेळी दिलीप जोशी , सरदारसिग ठाकुर, व्यकट पाटील, पंडीत पाटील, महेश घोडके, आजमोददीन शेख, काशिनाथ काळे, गुलाब शिदे, श्रीकात पोतदार, बालाजी ठाकुर, प्रताप ठाकुर, बाबुसिग रजपूत, दशरथसिग ठाकुर, मानसिग ठाकुर ईत्यादी शेतकरी उपस्थित होते.