लिं.प्रभुलिंगेश्वर पुण्यतिथीदिनी हजारो सदभक्तांनी घेतला महाप्रसाद,  दिक्षा अय्याचार संपन्न

अणदूर,दि.१७:

 येथील श्री निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती वैराग्यमूर्ती श्री.ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली मठात लिं.प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी रात्री शिवभजन करण्यात आले. शनिवारी सकाळी महास्वामीजींच्या हस्ते  समाधीस रुद्राभिषेक व महापुजा झाल्या नंतर मठात हजारो सदभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.रविवारी मठात  महास्वामीजींनी शेकडो सदभक्तांना दिक्षा व अय्याचार दिला.यावेळी मानव धर्माचा विजय असो - धर्मानेच विश्वाला शांती   तसेच महास्वामीजींचा जय जयकार करण्यात आला.  

शनिवारी दिवसभरात  हिरेनागाव,हरसूर,  जेवळी, केसरजवळगा,  अचलेर येथील महास्वामीजी तसेच वे.बसवराज शास्त्री तीर्थ यांच्यासह माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आदी मान्यवरांनी हजेरी लावली. या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वे.विवेकानंद स्वामी व वे.नरेंद्र स्वामी यांनी केले. या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यासह लातूर, सोलापूर तसेच पुणे,मुंबई,गुलबर्गा येथील सदभक्तांनी हजेरी लावली. या धार्मीक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुराव कबाडे, महादेव मुळे, चंद्रशेखर शेटे,श्रीमंत मुळे,सरपंच रामचंद्र आलुरे, कल्याणी मुळे, अप्पू धमुरे,धनराज मुळे,संतोष मुळे, रामलिंग नरे,महेश कर्पे,श्रीशैल लंगडे, बाबुराव मुळे,गुरुनाथ मिटकरे, बसवराज नरे आदी श्री निलकंठेश्वर  मंडळाचे सदभक्त तसेच महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र  परिश्रम घेतले.
 
Top