बोरी धरणातील नवीन पाण्याचे  जलपूजन मंत्रोच्चाराच्या जयघोषात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न 

नळदुर्ग,दि.१७ : 

नळदुर्ग येथील बोरी धरण हे तुडूंब भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे.भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या हस्ते रविवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी  ११ वाजता नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी धरण ) मध्यम प्रकल्पात  आलेल्या नवीन पाण्याचे मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधीपूर्वक पूजन करून  जलपूजन करण्यात आले.

नळदुर्ग येथील बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून चार दिवसांपासून  धरणाचा सांडवा वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे  तिर्थक्षेत्र तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर यांसारख्या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.
भाजपचे नेते सुशांत भूमकर, शहराध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण अध्यक्षा रंजना राठोड,

सरपंच युवराज पाटील, राज्य परिषदेचे सदस्य सिद्धेश्वर कोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, अशासकीय सदस्य विलास राठोड , माजी नगरसेवक सुधीर हजारे,  निरंजन राठोड, छमाताई राठोड, किशोर नळदुर्गकर, श्रमिक पोतदार,माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पद्माकर घोडके,  दीपक अलुरे, साहेबराव घुगे, सचिन घोडके ,विशाल डुकरे ,पप्पू पाटील, बबन चौधरी, अक्षय भोई,  सुदर्शन पुराणिक,विक्रांत दुधाळकर, , संजय जाधव , शरद देशमुख , कल्पना गायकवाड, शिवाजी राठोड, विवेकानंद मेलगिरी, संदीप गायकवाड‌‌‌, शशिकांत पुरावे, सरपंच सुरेश बिराजदार ,महादेव सालगे, वैभव पाटील, स्वप्निल काळे, विजय शिंगाडे, जयेश कदम, अबुलहसन रजवी, सुजित जमदाडे, नाना काझी ,अशोक बंजारे, दर्शन शेटगार, गणेश मोरडे,  विजय ठाकूर ,सुनिल गव्हाणे, प्रकल्प व्यवस्थापक सौदागर कोंगे, युवराज आरेकर,नळदुर्ग  पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता आर. व्ही. टोकलवड, ए.डी. डावरे , कर्मचारी  आर बी डोईफोडे, जे डी तायडे, पी बी गोधडे, तानाजी राठोड, आदीसह नागरिक, कार्यकर्ते , पदाधिकारी उपास्थित  होते.

जून महिन्यात बोरी धरण पाणलोट क्षेत्रातील सलगरा (दि) , होर्टी  साठवण तलाव पूर्ण भरल्याने बोरी धरण लवकर भरेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर पावसाने हुलकावणी  दिल्याने धरण भरण्यास उशीर झाला. गेल्या आठवड्यापुर्वी  पासून  झालेल्या जोरदार पावसामुळे अखेर हे धरण पूर्ण भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणलोट क्षेत्रातील चिकुंद्रा, मानेवाडी, हगलुर,  मुर्टा या गावांतील शेतकऱ्यांसह येडोळा, निलेगाव, अणदूर, खुदावाडी, वागदरी, गुजनूर, शहापूर, दहिटना, गुळहळ्ळी ईत्यादी गावांतील  ३ हजार ५००  हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगाम व अन्य पिकासाठी पाणी मिळणार आहे.

 
Top