गंगणे दांम्पत्यांनी घडवले ७० महिलांना देवदर्शन

तुळजापूर,दि.१७ : 

 
 श्रावण महिन्यातील धार्मिक भावनेला जोड देत युवा  सामाजिक  कार्यकत्या   प्रियांकाताई  विजय गंगणे यांनी तुळजापूर शहरातील विविध भागांतील तब्बल ७० महिलांना देवदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. चार टेंपो, ट्रॅव्हलरद्वारे या महिलांना पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, अंबाजोगाई अशा प्रमुख देवस्थानांचे दर्शन घडविण्यात आले.

धर्मस्थळांच्या भेटीनंतर या महिलांना सोलापूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घडविण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

तिर्थ क्षेञ तुळजापूर शहरात प्रियंकाताई  यांनी त्यांचे पती विजय  गंगणे यांच्या माध्यमातून त्यांनी मुस्लीमाचे  सण  ईद हिंदुंचा सण दिवाळी हे साजरे करण्यासाठी गेली अनेक वर्षापासुन गोड धोड करण्यासाठी व सण साजरे करण्यासाठी अनेक कुंटुंबाना शिधा साहित्य  रुपी मदत करीत आहेत. विशेषता गोरगरीब वस्तीतील लोकांना आवर्जून घरी बोलवुन मदत करतात.

 
 
Top