लोहारा : शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दही हंडी उत्सव साजरा,सलग २२ व्या वर्षीही मोठ्या जल्लोषात दही हंडी महोत्सव साजरा

         
लोहारा,दि.१७:

 शहरातील शिवनगर येथे सालाबादप्रमाणे सलग २२ व्या वर्षीही शिव मित्र मंडळाच्या वतीने गोविंदा आला रे आला, च्या जयघोषात याही वर्षी शनिवारी  दि.१६ रात्री ८ वाजता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत गोविंदा पथकाने मोठ्या उत्साहात फोडली.
        
शहरातील शिवनगर येथे गेल्या २२ वर्षापासून शिव मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हंडी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याही वर्षी दही हंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ही दहिहंडी फोडण्यासाठी शिव मित्र मंडळाच्या युवकांनी ४ मानवी मनोरे तयार केले होते. यावेळी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या दिपक बालाजी क्षिरसागर या गोविंदाने मोठ्या जल्लोषात दही हंडी फोडली. 
       
या गोविंदा पथकात धनंजय दरेकर,  कमलाकर मुळे, राजेंद्र माळी, श्रीनिवास माळी, अमोल माळी, अशोक दुबे, आप्पा लोखंडे, शेखर पाटील, ओमकार बिराजदार,  कान्हा वाघ, गणेश बिराजदार, सोहम काटे, इरशाद तळणीवाले, अभय माळी, धिरज माळी, राम चपळे, अभिमन्यू रोडगे, विक्रम माळी, अभिजित माळी, गणेश बिराजदार, महेश पाटील, महेश बिराजदार, शिवकुमार बिराजदार, राहुल माळी, शशिकांत माळी, पप्पू बिराजदार, दिनेश गरड, बाळू क्षिरसागर, शुभम बेळे, निखिल मुळे, यांच्यासह आदींचा गोविंदा पथकात समावेश होता.
   
  यावेळी अमोल बिराजदार, सोमनाथ मुळे, , किरण पाटील, विष्णू माळी, महेश गुंडू बिराजदार, अमर काडगावे, शुभम माळी, धिरज माळी, बजरंग माळी, भिमाशंकर मुळे, अशोक काटे, ओंमकर बिराजदार, तम्मा पाटील, चेतन क्षिरसागर, किशोर माळी, दिपक मुळे, हरी लोखंडे, अशोक काटे, अंकुश नारायणकर, नवनाथ लोहार, भागवत झिंगाडे, गोरख लोखंडे, शामसुंदर नारायणकर, शरण माळी, भागवत जवादे,  यांच्यासह शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी दही हंडी पाहण्यासाठी बाल गोपाळांसह, महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.




      लोहारा: शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दही हंडी फोडताना गोविंदा पथक दिसत आहे.
 
Top