नंदगाव  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा प्रभारी सरपंचपदी शशिकांत नागिले यांची बिनविरोध निवड 

नळदुर्ग,दि.१६ :

 नंदगाव ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा प्रभारी सरपंचपदी शशिकांत बळीराम नागिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्याबद्दल भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य तथा पॅनल प्रमुख सिद्धेश्वर कोरे यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीचे संरपच 
  सौ.राधिका विद्यानंद घंटे यांना तीन आपत्य कारणामुळे येथिल सरपंच  पद रिक्त झाले असून ती जबाबदारी उपसरपंचाकडे देण्यात आली होती. विद्यमान उपसरपंच सौं महादेवी भिमराव चिनगुंडे यांनी राजीनामा दिल्याने त्या जागेवर  शशिकांत नागिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य तथा पॅनल प्रमुख सिद्धेश्वर कोरे यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी  निवडणूक अधिकारी म्हणून तुळजापूर प.स. चे विस्तार अधिकारी (पं) ए.सी. कावळे , तर  सहाय्यक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे हे  होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य धंनराज कलशेट्टी , विरसंगप्पा जमादार , नागनाथ पाटील ,सूर्यकांत अरबळे ,कोमल काटे ,मीनाक्षी मोरे ,नंदाबाई कामशेट्टी , महादेवी चिनगुंडे , राधिका कांबळे , गावातील प्रतिष्ठित नागरिक  , प्रशांत करंडे ,बसू कोरे ,सतीश काटे , इरन्ना वाले, सागर चौगुले, विश्वजित घंटे,मोहन मोरे,सचिन कोरे , सागर कांबळे ,अप्पू कोरे ,मल्लिनाथ कामशेट्टी , अध्यक्ष तुप्पे आदि  उपस्थित होते.
 
Top