प्रतिकात्मक छायाचित्र
धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची संजय पाटील दुधगांवकर यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी
मागणी
धाराशिव,दि.१६ :
धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने आर्थीक मदत जाहीर करावी, तसेच सन 2024-2025 मधील पडलेल्या पावसाची नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
धाराशिव जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे, कधी कोरडा तर कधी ओला. दर तीन ते चार वर्षाने जिल्ह्यामध्ये अत्यल्प पावसामुळे कोरडा दुष्काळ हमखास असतो. त्यातच या वर्षी जिल्ह्यात पावसाने इतकी मेहरबाणी केली की दि.11 मे 2025 पासून दि.15 ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्ह्यातील कळंब, वाशी, धाराशिव, भुम व तुळजापूर तालुक्यात धो-धो पाऊस पडला.
जिल्ह्यात जवळपास 693 मी.मी. पाऊस झाला असून या पावसाने नदी,नाले, ओढे तुडूंब वाहिल्यामुळे हजारो हेक्टर शेती व त्यावरील पीके,भाजीपाला, ऊस व विजेमुळे १०० पेक्षा जास्त जनावरे व मनुष्य हाणी या पावसाळ्यामध्ये झाली. शेतकऱ्याचे मुख्य पीक असणारे सोयाबीन डोळ्या देखत पाण्यामध्ये 10-10, 12-12 तास बुडालेले बघीतले. यामुळे अगोदरच आर्थीक संकटात असलेला शेतकरी पार कोलमडून गेलाय. मांजरा, तेरणा, वाशीरा, सिना, तावरजा, भोगावती, बाणगंगा या नद्याच्या बाजुला असणारी शेते व तेथील पीक गेली तीन दिवसझाले पाण्यामध्ये आहेत. नदी, नाले, तळी व जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील हजारो हेक्टर जमीनी वरचा २-3 फुटाचा थर पाण्याने खरडून वाहून गेला, पशुधनाचा चारा संपला. अजुनही एक महिना पावसाचा शिल्लक असून सरासरी पावसापेक्षा आजच जिल्ह्यात पाऊस जास्त झाला असल्याकारणाने व शेतकऱ्याचे मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता मदत मिळणे अत्यावश्यक असून शासनाने पंचनामे आदी सोपस्कार न करता ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट आर्थीक मदत करावी तसेच सन 2024-2025 मध्ये घोषीत केलेली नुकसान भरपाई त्वरीत देण्यची मागणी केली आहे.यांची प्रत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.