नळदुर्ग शहरात विशेष शिबीर आयोजित करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील- प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश देशमुख
नळदुर्ग,दि.१६:
यापुर्वी भाजपच्या वतीने झालेल्या व आजच्या जनता दरबारातील श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना व इतर तहसील संबंधित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात नळदुर्ग शहरात विशेष शिबीर आयोजित करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश देशमुख यांनी सांगितले.
भरतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश देशमुख व नळदुर्ग पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१६ ऑगस्ट रोजी नळदुर्ग शहरातील हुतात्मा स्मारकात आयोजित जनता दरबारात २४ तक्रारीची नोंद झाली.यावेळी नागरिकांतुन प्रतिसाद मिळाला.
संकल्प ते सिद्धी अभियान नरेंद्र मोदी सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक येथे शनिवारी आयोजित जनता दरबारात श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान, लाडकी बहीण, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पथदिवे, उर्दु शाळेला पाणी व्यवस्था करणे , सटवाई मंदिराचे सुशोभिकरण करणे आदीसह इतर तक्रारीची नोंद झाली आहे. यावेळी भाजपचे सुशांत भुमकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सुरेश देशमुख यांची भरतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नळदुर्ग भाजप शहर मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, माजी नगरसेवक निरंजन राठोड, संजय जाधव, पद्माकर घोडके, श्रमिक पोतदार, विशाल डुकरे,गणेश मोरडे, संदीप गायकवाड, अक्षय भोई, अभिजित लाटे, मुद्दसर शेख, नाना काझी, विजय ठाकूर, सुदर्शन पुराणिक,रवी ठाकूर,रियासत शेख, नसीम शेख, खय्युम सुबेकर,सिकंदर काझीसह प्रभाग क्रमांक ८ मधील महिलासह नागरिक उपास्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नय्यर जहागिरदार यांनी केले.