आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल राजेनिंबाळकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश
महाविकास आघाडीतील स्वार्थी राजकारणामुळे पक्ष सोडल्याचा आरोप
धाराशिव दि.१६ :
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जगता पार्टीमध्ये दि.१५ ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांना प्रवेश देत त्यांचे स्वागत केले.
धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेनिंबाळकर, महिला शहराध्यक्ष कमलताई सागर चव्हाण यांच्यासह अजय पाटील, सचिन कदम, रियाज भाई शेख, सुरज पडवळ, विनोद शिरसाट, समाधान घोडके, नाना वाघमारे, गुणवंत पेठे, योगेश ननवरे, प्रतीक गायकवाड, ऋतिक देवकुळे, अमोल जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेनिंबाळकर, महिला शहराध्यक्ष कमलताई सागर चव्हाण यांच्यासह अजय पाटील, सचिन कदम, रियाज भाई शेख, सुरज पडवळ, विनोद शिरसाट, समाधान घोडके, नाना वाघमारे, गुणवंत पेठे, योगेश ननवरे, प्रतीक गायकवाड, ऋतिक देवकुळे, अमोल जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, , माजी नगराध्यक्ष मधुकर, तावडे, शहराध्यक्ष अमित शिंदे, ज्येष्ठ नेते सुनील काकडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद गपाट, अक्षय ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले की, जिल्ह्याच्या विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न करून वेगवेगळे प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले. उजनीचे पाणी धाराशिवला आणण्यासाठी ज्यावेळी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी देखील विरोधकांनी आमच्यावर जोरदार टीका करीत एक प्रकारे थट्टाच उडवली होती. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत सातत्याने प्रयत्न करून ते पाणी धाराशिवकरांना आणून दिल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या शहरातील रस्ता व इतर विकासाची कामे सुरु असून ती लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुढे जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग आणून तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यापैकी काही कामे मार्गी लावली तर काही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये धाराशिव नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला फडकवायचा आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासह स्वयंरोजगार कसा मिळेल यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुणाल निंबाळकर यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीत मनमानी चालु असुन कोणालाही विश्वासात घेतले जात नसल्याचे आरोप करुन टिका केली.