जवाहर महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ''ग्रंथप्रदर्शन"संपन्न
अणदूर दि.12.
येथील जवाहर महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन व शिक्षण महर्षीं सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व फीत कापून ,दीप प्रज्वलित करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी होते व याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे ,ग्रंथपाल प्रा. शैलेश शाईवाले, ग्रंथालय सल्लागार समितीचे सदस्य डॉ. एस. जी. बिराजदार, डॉ. आर. व्ही. वरशेट्टी, डॉ.एम. बी . बिराजदार, डॉ.डी. एस. सूर्यवंशी, डॉ. श्रीमती एम. एन. गडसिंग, डॉ.ए.एम.पाचपिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे व प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.चनशेट्टीम्हणाले की, ग्रंथपाल दिनानिमित्त वाचाल तर वाचाल असा कानमंत्र देऊन वाचनाशिवाय जग अधुरा असल्याचे सांगून सर्वांनी खऱ्या अर्थाने चिंतन करू या ,आपण पुस्तकाच्या संपर्कात किती वेळ राहतो ? जीवन समृद्ध करायचं असेल तर ग्रंथाच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. ग्रंथ हेच आपले गुरु आहेत .वाचन करा, उत्कृष्ट कानसेन व्हा, जास्तीत जास्त पुस्तक वाचण्याचा संकल्प करू या .लेखन संस्कृती वाढवू या सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे. पुस्तक वाचल्यामुळे अण्णा हजारे यांच्या जीवनात झालेले परिवर्तन सांगून पुस्तकाचे स्थान कसे श्रेष्ठ आहे आणि हे आदर्श आत्मसात करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.शैलेश शाईवाले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मल्लिनाथ बिराजदार यांनी व आभार डॉ. एस.जी. बिराजदार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रसन्न कंदले, श्री. संतोष चौधरी, श्री. गणेश सर्जे , श्री. सुमित चौधरी, श्रीमती शुभांगी स्वामी , श्री. महादेव काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.