ईटकळ ते मुस्ती शिव रस्ता तात्काळ दुरुस्तीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन

अणदूर,दि.१२ :

ईटकळ केशेगाव रोड ते मुस्ती शिव हा दोन किलोमीटर तसेच ईटकळ गाव ते मुस्ती शिव हा चार किलोमीटर रस्ता अतिशय दलदलीचा आणि परिसरातील शेतकऱ्यांना रहदारीसाठी निरुपयोगी झाल्याने तात्काळ दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन  ईटकळ येथील शेतकरी-यांनी जिल्हाधिकारी कीर्तीकीरण पुजार यांच्याकडे केली आहे .

निवेदनात नमूद केले आहे की ईटकळ केशेगाव रस्ता ते मुस्ती दरम्यान पिढी जात  रस्ता आहे या रस्त्यात मध्ये एक ओढा असून पावसाळ्यामध्ये या रस्त्यालाही आणि ओढ्यालाही मोठा पूर येतो पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यानंतर जवळपास तीन महिने या रस्त्यावर गुडघ्या एवढे पाणी असते त्यामुळे हा रस्ता पायी चालण्यासाठी सुद्धा जिकिरीचा झाला आहे . तसेच शेतमाल शेतातील वाहने यांची ये -जा करणे अतिशय कठीण झाले आहे . सध्या शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नसून पेरणी ,खुरपणी ,कोळपणी, नांगरणी, पिके काढणे, ऊस तोडणे हे सर्व कामे यंत्राद्वारे करावे लागतात मात्र या रस्त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यंत्रही जाणे.. येणे अवघड आहे. . 
अशीच परिस्थिती ईटकळ गाव ते मुस्ती रस्त्याची झाली आहे हा रस्ता ईटकळ ते मुस्ती प्रवाशांना  ये जा करण्यासाठी अतिशय जवळचा आणि कमी वेळेचा असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते मात्र हा रस्ताच दलदलीचा झाल्याने शेतकऱ्यांना चार किलोमीटर लांबचा वळण रस्ता वापरावा लागत आहे .
 तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा आणि शेतकऱ्यांची होत असलेली तारांबळ थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन लगेच तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना फोन लावून सदरील रस्त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले . याविषयी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना संपर्क साधला असता सदरील निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तात्काळ जी काही कार्यवाही करता येईल ती निश्चितपणे केली जाईल, आणि रस्त्याचा विषय मार्गी लावला जाईल असे सांगितले .

निवेदनावर शिवानंद हांडगे , सिद्धनाथ माशाळकर , अविनाश पाटील , पंडित पाटील ,  प्रकाश हुकिरे, महेश हुकिरे , विश्वनाथ हांडगे , मल्लिनाथ कोरे, दत्तात्रय हुकिरे , बालाजी सोनटक्कें, शेकुंबर मुजावर ,  अमोल पाटील श्याम क्षीरसागर ,नामदेव गायकवाड यांच्या सह्या आहेत .
 
Top