स्वतःबरोबर इतरांसाठी समर्पित जीवन अर्पण करणारे=सुभाष सूर्यवंशी गुरुजी ; वयाच्या ७८ व्या वर्षी निधन, अवयव दानाने नवसंजीवनी

अणदूर दि.७ चंद्रकांत हगलगुंडे 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील  निवृत्त शिक्षक तथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे खरेखुरे हाडाचे शिक्षक. एवढेच नव्हे तर बोले तैसे चाले, त्याची वंदनी पाऊले याची खरी प्रचिती आज पहावयास मिळाली. गुरुजी हयात असतानाच देहदानाची संकल्पना आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असली तरी गुरुजींच्या जाण्याने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कायमची पोकळी निर्माण झाली हे मात्र विसरता येणार नाही.

आदर्श शिक्षक स्व. सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांचे प्रदीर्घ आजाराने आज दि.7 रोजी सकाळी निधन झाले. निधनापूर्वी हयात असतानाच त्यांनी देह दानाची संकल्पना केली होती. हा संकल्प आज गुरुजींच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. जेणेकरून त्यांच्या शरीरातील अवयव इतरांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण करू शकतील. गुरुजींचा हा आदर्श निश्चितच प्रेरणादायी व दिशा देणारा ठरेल.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे या वक्तीप्रमाणे गुरुजी अखंड विद्यार्थी व समाजासाठी तन -मन -धनाने काम करत असत. शिक्षणापासून वंचित असलेल्या निराधार साठी तर ते दैवतच होते. संपूर्ण जीवन तळागाळातील, वंचिता साठे खऱ्या अर्थाने समर्पित केले. शेवटी आपल्या देहाचे देहदान करून अमर झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
 
Top