जय भवानी तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज साखरे तर सचिव धीरज शंकरशेट्टी यांची सर्वानुमते निवड 

नळदुर्ग,दि.०७

नळदुर्ग शहरातील जय भवानी तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज साखरे तर सचिव धीरज शंकरशेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी व नूतन कार्यकारिणीची  निवड करण्यासाठी जय भवानी तरुण गणेश मंडळांच्या सदस्यांची बैठक जयभवानी चौकात गणपती मंदिरा समोर झाली.यावेळी नुतन कार्यकारणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली.

अध्यक्ष युवराज साखरे, उपाध्यक्ष सोमनाथ  बदुले, श्रीकांत कलशेट्टी ,कोषाध्यक्ष राहुल बताले,  केवल पाटील, सचिव धीरज शंकरशेट्टी, लेझीम प्रमुख श्रीनिवास मुळे , सोमनाथ बताले ,अभिषेक आवटे , अभि हुलगे , मिरवणूक प्रमुख संजय  बताले , नितीन कासार ,वैजिनाथ कोरे, संगमेश्वर व्हनाळे ,कल्याणी कलशेट्टी, महेश कोप्पा पाटील, गणेश मुळे, दर्शन शेटगार, बंडू कसेकर, सोमनाथ कसेकर , महेश खटके, सिद्धु मानशेट्टी, संतोष बताले आदींची निवड करण्यात आली. यावर्षीच्या गणेशोत्सवाकरिता माजी नगरसेवक संजय बताले यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना गणवेश दिले आहे.
 
Top