नंदगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 

नंदगाव,दि. ०१ : शाम नागिले  

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार रोजी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली.

 प्रेरणादायी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी भूमिका बजावत, आपल्या साहित्यातून शेतकरी, शेतमजूर, श्रमिकांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आणि सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवला. बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे थोर सत्यशोधक साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. 

प्रथमता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सिद्धेश्वर कोरे व ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नागिले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी दलित पँथर जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागिले, आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे  तालुका अध्यक्ष प्रेमनाथ दणाणे, सामाजिक कार्यकर्ते सतीश काटे, विश्वजित घंटे,संतोष कांबळे, सुग्रीव दणाणे, नागनाथ दणाणे, सोपान दणाणे, शंकर सुरवसे, मल्लिनाथ गुड्डे, चिदानंद बसशेट्टी, सुनिल सुरवसे, संतोष दणाणे, जनार्धन दणाने आदीसह नागरिक उपस्थित होते.
 
Top