महावितरणचे नळदुर्गला उपविभागीय कार्यालय मंजूर केल्याबद्दल सरकारचे मनसेने मानले आभार

नळदुर्ग,दि.०२ : 

 गेल्या अनेक वर्षापासूनची नळदुर्ग येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय व्हावे ही मागणी होती. या मागणीची पूर्तता होवुन महावितरणचे नळदुर्गला उपविभागीय कार्यालय मंजूर केल्याबद्दल सरकारचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आभार मानल्याचे पत्रकाद्वारे सांगितले आहे.


नळदुर्ग येथे उपविभागीय कार्यालय मंजूर करून कार्यान्वित करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती, त्यकरिता आंदोलनेही केल्याचे सर्वश्रुत आहे.

महावितरणचे कार्यालय मंजूर होऊन लवकरच कार्यान्वित झाल्यास विज बिल दुरुस्ती,थ्रीफेज डिमांड,फिल्टर ऑफिस,स्वतंत्र निधी अशा बाबी सोयीस्कर होणार आहेत,त्याच बरोबर नागरिकांना होणार त्रास कमी होऊन त्यांची कामे नळदुर्ग येथेच मार्गी लागतील,सरकारने या मागणीची दखल घेत जो निर्णय घेतला आहे,त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सरकारचे अभिनंदन व आभार मानतो असे नळदुर्ग मनसेचे प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
 
Top