भाजपच्या वतीने मराठा गल्ली येथिल आयोजित जनता दरबारात ४४ तक्रारीची नोंद; त्यास  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नळदुर्ग,दि.०२: ऑगस्ट 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार दि.०२ ऑगस्ट प्रभा रोजी नळदुर्ग शहरातील मराठा गल्लीतील व्यायाम शाळेत (प्रभाग क्रमांक ५ )  सकाळी १० ते १ वाजण्याच्या कालावधीत आयोजित जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन एकुण ४४
 तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत.

संकल्प ते सिद्धी अभियान नरेंद्र मोदी सरकारचे  अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या नेतृत्वाखाली  मराठा गल्ली येथे शनिवारी आयोजित जनता दरबारात महिलांनी बगीचा करणे, अंतर्गत रस्ते करणे व अंगणवाडी बांधण्याची मागणी करण्यात आली.तर पुरुषांनी नरसिंह मंदिर येथे सभागृह बांधणे,
आरो प्लांट आरो, स्वस्त धान्य दुकानातुन केसरी शिधापत्रिकेवर बंद झालेले धान्य पुर्ववत चालु करणे, त्याचबरोबर नालीवर किटकनाशक औषधाची फवारणी करुन स्वच्छतेस प्राधान्य देण्याच्या मागणीसह एकुण ४४ तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत ..

याप्रसंगी भाजपचे नेते सुशांत भूमकर ,नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार,  माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,विनायक अहंकारी, सुधीर हजारे, पांडुरंग पुदाले, संजय जाधव,सिकंदर काझी,  राजेंद्र महाबोले, शरद देशमुख, बाळू महाबोले, सुरेश हजारे, राणी शिवाजी सुरवसे, मंगल गंगाधर सुरवसे, सूक्ष्म अरविंद माने, सुमन नेताजी किल्लेदार, कमल बाबुराव सुरवसे, स्वाती गायकवाड,मच्छिंद्र जाधव, सुरेश हजारे, स्वराज गायकवाड,अमोल सुरवसे ,विनायक पुदाले ,गणेश मोरडे , नाना काझी, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, फिरोजखान पठाण, फिराद काझी ,गौस काझी,फारुख शहा, खय्युम शहा, मुजाहिद काझी, असलम काझी आदीसह नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत भुमकर यांनी  तर आभार धिमाजी घुगे यांनी मानले.
 
Top