पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी मुंबई आझाद मैदानावर आंदोलन
नळदुर्ग,दि.०२:
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी वैशाली राणे व भारती साळवे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दि 13 ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात धाराशीव जिल्ह्याची बैठक नळदुर्ग येथे जिल्हाध्यक्ष सलामत टिनवाले यांच्या अध्यक्ष्यतेखाली शासकीय विश्राम गृह येथे पार पडली. गेली 25 वर्षापासून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सलामत टिनवाले, अंबादास क्षीरसागर, एस के गायकवाड, धिमाजी घुगे, अतुल सलगरे, चंद्रकांत राठोड ,चंद्रकांत बिराजदार, माणिक निर्मळे, महेश कार्ले, शांतू इंगवे, नेहरू आरळे, शिवाजी व्होनाळे, अमानुल्लाह इनामदार, परमेश्वर चिनगुंडे, शिवराज कोरे, गुणवंत घोडके, तानाजी गवळी, प्रभाकर कांबळे, अरुण माने, दत्ता सिलवंत ,शाहिद अत्तार इत्यादी अंशकालीन उपस्थित होते. 13ऑगस्ट रोजी पासून सुरु होणाऱ्या आंदोलनास जास्तीत जास्त संख्येने अंशकालीन बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.