चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या रस्त्याचे काम रखडले ; रस्त्या अभावी ग्रामस्थांचे ऐन पावसाळ्यात प्रचंड हाल
नळदुर्ग दि. ३ :
तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लोहारवाडी येथील एक कि.मी रस्तयाचे काम ४ वर्षापुर्वीपासुन रखडत पडले असुन रस्त्या अभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास काम सुरु करुन पुर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी सरपंच पती चंद्रकांत लोहार यांनी केली आहे.
इतर जिल्हा मार्ग ८१ ते लोहार वस्ती जोड रस्ता काम
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजुर आहे. या
स्त्याचे काम सुरू करण्याचे ठेकेदारास दि.२८/०६/२०२१ रोजी धाराशिव येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता (प्रमंग्रासयो) यादव.अ.आ. यानी कार्यारंभ आदेशीत केले आहे . ठेकेदाराने काम सुरु करताच रस्त्या लगतचे कांहीं शेतकऱ्यांनी काम अडविले.त्यामुळे हे काम चार वर्षापासुन रखडत पडल्याने ऐन पावसाळ्यात महिला भगिनी, शाळकरी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रचंड हाल
सोसावे लागत असल्याचे चंद्रकांत लोहार यांनी बोलताना सांगितले.
मुख्यामंत्री ग्रामसडक योजने करिता सनियंत्रण व आढावा दक्षता समिती गठीत केलेली आहे. सदर समितीने मान्यता दिलेल्या रस्त्यांच्या कामासाठी भुसंपादन करणे, अतिक्रमण हटवणे व इतर अडचणी दुर करून समनव्य साधण्याची जबाबदारी या समितीची आहे. फुलवाडी ता.तुळजापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या व इतर जिल्हा मार्ग – ८१ ते लोहारवस्ती जोडरस्ता काम मुख्यतंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर आहे. सदर काम सुरू करण्यासाठी ठेकेदार यांना दि.१८/०६/२०२१ रोजी आदेशित केले आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदार यांनी काम सुरू केले असता कांही शेतकऱ्यांनी काम करण्यास अडथळा केले.
सदर रस्त्यावर यापुर्वी शासनाच्या इतर योजनेतुन खडीकरण व नळकांडी पुलाचे काम झालेले असुन दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा पंचनामा मंडळ अधिकारी व शेतकरी तसेच गावकरी यांच्या समक्ष जाय मोक्यावर जाऊन केलेला आहे.
त्यानुसार सदर काम करण्यासाठी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी रस्त्याचे महत्व समजावुन सांगुन समुपदेशन करून देखील त्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम करण्यास मोजणी अभावी व हद्द् कायम करून देण्याच्या मागणीसाठी अडथळा निर्माण करून काम बंद केलेले आहे. त्याकरिता संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी धाराशिव पोलिस अधिक्षक यांच्याकडे पोलिस बंदोबस्तची मागणी केली. त्याचबरोबर तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तुळजापूर यांनी दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी नळदुर्ग पोलिस निरीक्षक यांना रस्त्याच्या कामांकरिता पोलिस संरक्षण मिळणे बाबत लेखी कळविले. मात्र अजुनही रस्त्याचे काम चालु झाले नाही. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून त्वरित रस्त्याचे काम सुरु करुन ग्रामस्थांना दिलासा देण्याची लोहार यांनी मागणी केली आहे.