नळदुर्ग शहरात ढोल ताशांच्या गजरात ३० सार्वजनिक गणेश मंडळानी तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५६ मंडळानी केली गणरायाची प्रतिष्ठापना
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या पुर्व संध्येला वरुण राजाने जोरदार हजेरी लावली.त्यानंतर लपंडाव खेळत बुधवारी रात्रभर व गुरुवारी सकाळपासून पावसाची संततधार चालु आहे. बुधवार दि.२७ ऑगस्ट रोजी नळदुर्ग शहर व परिसरातील विविध गावांमध्ये पावसातच गणपती बाप्पाचे आगमन ढोल ताशांच्या गजरात भक्तीमय, उत्साहात झाले आहे.
नळदुर्ग शहरात मोठ्या व लहान असे मिळुन ३० सार्वजनिक गणेश मंडळांनी "श्रीं"ची स्थापना केली आहे. यात १९ मंडळांनी पोलिसांचा परवाना घेतला आहे. तर १५ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.त्याचबरोबर नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ९९ गावात १५६ मंडळानी गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन यादव, गोपीनिय शाखेचे अमर जाधव यांनी "तुळजापूर लाईव्ह"शी बोलताना सांगितले.
नळदुर्ग शहरातील बेडगे गल्ली येथे जवाहर तरुण गणेश मंडळ, मराठा गल्ली येथे शिवशाही तरुण गणेश मंडळ, जैन गल्ली येथे जय जिनेद्र तरुण गणेश मंडळ, भवानी चौकातील जय भवानी तरुण गणेश मंडळ, बसवेश्वर चौक येथे बसवेश्वर तरुण गणेश मंडळ, म. गांधी तरुण गणेश मंडळ, किल्ला रोड रोकडया हनुमान गणेश मंडळ, शास्त्री चौक जय हनुमान तरुण गणेश मंडळ, महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळ, लोकमान्य तरुण गणेश मंडळ ,माऊलीनगर येथे माऊली नगर तरुण गणेश मंडळ, बाळकृष्ण तरुण गणेश मंडळ, व्यासनगर येथे जय हिंद तरुण गणेश मंडळ, आयोध्यानगर येथे शिवनेरी तरुण गणेश मंडळ, व्यंकटेशनगर येथे व्यंकटेश गणेश मंडळ, इंदिरानगर येथे गणराज गणेश मंडळ, तुळजाई तरुण गणेश मंडळ, जगतापनगर येथे एकता तरुण गणेश मंडळ, दुर्गानगर येथे जय वडार समाज तरुण गणेश मंडळ, वसंतनगर येथे जय सेवालाल तरुण गणेश मंडळ, रामलीलानगर येथे विघ्नहार गणेश मंडळ ,साठेनगर येथे मातंग समाज तरुण गणेश मंडळ, पोलीस ठाणेसमोर जय हिंद तरुण गणेश मंडळ, क्रांती चौक येथे भोईराज तरुण गणेश मंडळ, चावडी चौकात व्यापारी तरुण गणेश मंडळ, भारत माता तरुण गणेश मंडळ, चैतन्य तरुण गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी चौकात धर्मवीर तरुण गणेश मंडळ, सावरकर चौकात सावरकर तरुण गणेश मंडळ, ब्राह्मण गल्लीत न्यू चैतन्य गणेश मंडळ ईत्यादी मंडळानी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भिमाशंकर बताले यांनी दिली.