स्वातंत्र्य दिनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
विविध आजाराची मोफत तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया होणार
अणदूर दि.13 चंद्रकांत हागलगुंडे
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत मूळव्याध,भगंदर,फिशर, पायलोनिडल सायनस, हर्निया, व हायड्रोसिल तपासणी, मार्गदर्शन मोफत दरात व अत्यल्प दरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सूरज शेख यांनी केले आहे.
लाईफ लाइन हॉस्पिटल मध्ये गेली अनेक वर्षे अल्प दरात उपचार व शस्त्रक्रिया अशी शिबिरे घेतली जातात, जनतेचे आपण काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने डॉ. शेख पती, पत्नी गोरगरीब जनतेची सेवा सातत्याने करीत असतात, शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत सदरील शिबिराचे आयोजन एस.टी.स्टँड जवळील लाईफ लाइन हॉस्पिटल मध्ये करण्यात आले आहे. नुकतेच लाईफ लाईन सिर्जिकल हॉस्पिटल येथे अत्याधुनिक मशीन प्रो डॉक्टर कॅमस्कोप, प्रगत वैद्यकीय कॅमेरा सिस्टिम गुदद्वार, मलाशय आणि सिग्मॉइड कोलन मधील आजारांचे अचूक निदान करणारी नवीन मशीन उपलब्ध करण्यात आली असून त्याचे उदघाटन प्रसिद्ध डॉ, समाजसेवक सिद्रामपा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या मशीन मध्ये अचूक, वेदनारहित आणि लवकर निदानासाठी प्रगत तंत्रज्ञान अवलंबण्यात आले आहे. त्याचा वापर या शिबिरात करण्यात येणार आहे.
तसेच या आजाराबद्दल अनेक गैरसमज समाजात असल्याने, त्याचे निराकरण व्हावे हाच त्यांचा उद्देश असून,त्यांनी देशांच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदरील मोफत शिबिर आयोजित केले असून, याचा लाभ परिसरातील सर्व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ. सूरज शेख व डॉ सौ.अमिना शेख यांनी केले आहे.