नळदुर्ग येथिल एस.टी. बसस्थानकास भेट देवुन
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गौरवोद्गार
नळदुर्ग,दि.०१:
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत सोलापूर -हैद्राबाद महामार्गावरील
(तुळजापूर आगारा अंतर्गत येणारा) नळदुर्ग येथील एस. टी. बसस्थानकाची अमरावती विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री पलंगे यांनी त्यांच्या पथकासमवेत पाहणी केली. त्यामध्ये स्वच्छतागृह, उपहारगृह, बसस्थानक परिसरात नव्याने लावलेले झाडे, प्रवाशांकरिता आसन व्यवस्था व त्याची स्वच्छता याची पाहणी केली.
नळदुर्ग येथील बस स्थानकातील स्वच्छतेची पाहणी, त्याचबरोबर झाडे जगवुन निटनेटकेपणा ठेवल्याबद्दल वाहतूक नियंत्रकाचे प्रशंसा त्यांनी करून त्यांचा गौरव केला.
यावेळी तुळजापूर आगार प्रमुख शिंदे नळदुर्ग बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे, मुकुंद वैद्य व अनिल हांडे, प्रवाशी उपस्थित होते.