समाजातील माणसं हेच माझे औषध
मधुकरराव चव्हाण यांचे भावनिक उदगार

 अणदूर दि . ४ : चंद्रकांत हागलगुंडे 

 येथील शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव  रामचंद्र आलूरे   निवृत्त मुख्याध्यापक निलकंठ नरे गुरुजी, बाबुराव कुलकर्णी गुरुजी , प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, गोपाळ कुलकर्णी ,उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार ,ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  संगप्पा हगलगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

92 व्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे फेटा बांधून ,शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचीत सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना चव्हाण  म्हणाले की, आपले पूर्वज महान होते. त्यांचे आदर्श आमच्या समोर आहे .आपल्या पूर्वजांनी काय केलेला आहे. याचं चिंतन करून ,कष्ट आठवून जीवन जगणे आवश्यक आहे. मोट, कुळव आणि नांगर म्हणजे काय? आजच्या पिढीला माहीत नाही. समाजातील माणसं माझ्यासाठी औषध आहेत. मी 22 वर्षापासून माणसात आहे. सामाजिक कार्यात सहभागी आहे. गुरुजींची आमची दहाव्या वर्षापासूनची मैत्री होती, आम्ही चांगलं राहावं, लोकांसाठी काहीतरी करावं हे वडीलधाऱ्यांना वाटायचं. चांगलं शिकावं, संस्कारानेच माणूस घडतो. ते संस्कार आपल्याला टिकवावे लागतात. गरिबीत शिकून अनेक माणसे मोठे झालेले आहेत .बॅरिस्टर अंतुले ,शरद पवार यांचे उदाहरण देऊन अनुभवाने माणूस घडतो. हे सांगून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. 

अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र आलूरे म्हणाली की, लहानपणी जो संघर्ष करतो तोच गरुड झेप घेऊ शकतो. चव्हाण साहेब आणि गुरुजींनी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अपार कष्ट झेलले आहेत. संस्काराचा वारसा त्यांनी आपल्याला दिलेल आहे .ते आपण पुढे घेऊन जाऊ या. ते आपल्यासाठी मैलाचा दगड आहेत. .परमेश्वरापेक्षाही आई-वडिलांचे स्थान महत्त्वाचे आहे. .यश ,अपयश येतात आणि जातात. पण अशी माणसं दीपस्तंभासारखे कार्य केल्यामुळे ते आपल्यासाठी महान आहेत. 

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार व आभार डॉ.राजेश शेखर नळगे यांनी मानले. या कार्यक्रमास सिद्रामप्पा नरे ,शिवाजी आलूरे ,बापू  बोंगरगे,अनंत अहंकारी, अमोल नरवडे, पत्रकार राजकुमार स्वामी, लक्ष्मण दुपारगुडे ,शिवाजी कांबळे, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top