नळदुर्ग शहरातुन शालेय विद्यार्थी व न.प. कर्मचाऱ्यांनी काढली तिरंगा रॅली 

नळदुर्ग,दि.१२ :

जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याची स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध  घटना याचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची  जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहाव्यात यासाठी  हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली, 

शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, अंजनी प्रश्नाला, 
जि.प. मुलांची शाळा , जि.प. उर्दू शाळेच्या वतीने शहरातुन  मंगळवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. ही तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली. सदर तिरंगा यात्रेत भाजपचे नेते सुशांत भुमकर, हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक साहेबराव घुगे, नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे, उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे,  पद्माकर घोडके, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, पांडूरंग पुदाले,  सिकंदर काझी, गौस शेख, अजय देशपांडे,  गणेश मोरडे ,अक्षय भोई, पप्पु पाटील, सागर हजारे, नेताजी महाबोले, किरण दुस्सा , विशाल डुकरे,  शाळेचे विद्यार्थी, केंद्रप्रमुख जाधव सत्येश्वर, मुख्याध्यापक भास्कर मस्के , श्रीमती वंदना चौधरी , बिलाल सौदागर ,श्रीमती सुरेखा मोरे , श्रीमती सुंदर भालकाटे, श्रीमती जयश्री धुमाळ ,श्रीमती प्रीती भंडारे, राहुल खोडके, संजय डुकरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,  अंजनी प्रशालेचे  मुख्याध्यापक ठोकळ व्ही. एन. , जयवंत मुळे , जितेद्र मोरखंडीकर ,बाबू राठोड,  शिदे आर. एम. , न. प, कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
 नळदुर्ग नगरपरिषदेच्या वतीने नळदुर्ग शहरातुन तिरंगा   रॅली  काढण्यात आली. ही तिरंगा रॅली नगरपरिषद कार्यालयापासून ते किल्ला गेट , कुरेशी गल्ली मार्गे हुतात्मा स्मारक,  बसस्थानक , बालाघाट कॉलेज ते नगरपरिषद कार्यालया पर्यंत काढण्यात आली.

 तिरंगा रॅलीत न.प.चे कार्यालयीन अधिक्षक खालील शेख, कर निर्धारक  प्रशासकीय अधिकारी पल्लवी पाटील, सहायक  प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड, सिएलटीसी अभियंता समीर मोकाशी , लिपिक रोहित नाईकवाडी, तानाजी गायकवाड, सुशांत डुकरे, सुशांत भालेराव, आण्णा जाधव, खंडू शिंदे, विकास बनसोडे, किशोर बनसोडे, दस्तगीर जहागीरदार, नवनाथ होनराव आदीसह माजी नगरसेवक , शहरातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.
 
Top