हर घर तिरंगा. अणदूर मध्ये भव्य रॅली
अणदूर दि.१३: चंद्रकांत हगलगुंडे
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कन्या शाळेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध वेशभूषानी विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते .भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणाने वातावरण प्रफुल्लमय पहावयास मिळाले.
राष्ट्रभक्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन असंख्य हुतात्म्यानी स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी बलिदान अर्पण केले, याची जाणीव व देशभक्तीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा, प्रत्येक घर, संस्था, व्यापारी प्रतिष्ठान, सर्व कार्यालय, यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत दीपक आलुरे, साहेबराव घुगे, महावीर कंदले, माजी सैनिक राजमाने, संभाजी काळजाते, दयानंद मुडके, शिवकुमार स्वामी, अरविंद घोडके, प्रवीण घोडके, लक्ष्मण बोंगरगे, काशिनाथ घुगे, निलेश आलूरे, नरेसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.