नळदुर्ग, दि.३० :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग
शहराच्या विकासासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करीत भोरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने "विकासासाठी झपाटलेला आमदार" म्हणुन उपस्थितानी कौतुक केले. या जनता दरबारास नागरिकात उन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नळदुर्ग येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवकरवाडी येथिल आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आयोजित जनता दरबारात एकूण ५८ तक्रारीची नोंद झाली आहे.
त्यामध्ये नागरी वस्ती असलेल्या जागेवर आरक्षण रद्द करुन रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळवुन देण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली.त्याचबरोबर गोडावुन समोरील भागात विद्युत खांबावरील विजेची तार ४० वर्षांपूर्वीची असुन ती जागोजागी तुटलेली असल्याने धोकादायक लाईन बदलणे, गटार, अक्कलकोट रोड परिसरात पथदिवे बसवणे यासह इतर तक्रारीचा समावेश आहे.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश देशमुख, धिमाजी घुगे, बाबासाहेब बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकास कार्याची माहिती देत कौतुक केले.