जय मल्हार रिक्षा गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी ओम भालेकर, मिरवणूकपदी नजीर शेख  यांची निवड

अणदूर दि. 22 चंद्रकांत हगलगुंडे

 अणदूर ता.तुळजापूर येथील बसस्थानक जय मल्हार रिक्षा गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी ओम भालेकर, मिरवणूकपदी नजीर शेख तर सचिवपदी सोमनाथ बेंद्रे यांची एक मताने निवड करण्यात आली.

दि. 21 ऑगस्ट रोजी जय मल्हार रिक्षा संघटनेची  बैठक खेळी मुळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली.
यावेळी अजित वचने पाटील, बालाजी पापडे, अनिल कबाडे, प्रशांत मुळे, सुनील गायकवाड, नितीन गळाकाटे, मारुती सोनटक्के, शिवाजी पापडे, गणेश पुजारी, सादिक शेख, दयानंद कांबळे, रमेश कांबळे, सलमान शेख, शिवा गायकवाड आदीसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top